सिध्दीविनायक पार्क बहुउद्देशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण

0

जळगाव । गुरुपौर्णिमेचे औचित्यसाधून सिध्दीविनायक पार्क बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज हरीओम नगर, सिध्दीविनायक पार्क परिसरात रोपांची लागवड करण्यात आली.

मनपा बाधकाम विभागाचे सुनिल तायडे, पाणी पुरवठा विभागाचे नाना सपकाळे, शिवाजी वाघ, नगरसेवक राजू मोरे, प्रदीप सोनवणे, नितीन मोरे, संस्थेचे अध्यक्ष भगवान बाविस्कर व उपाध्यक्ष विनोद राणे, सचिव मनोज शिंपी, हेमंत व्यास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात कडूलिंब, आंबा, आवळा, बदाम, चिंच, गुलमोहर आदी रोपांचा समावेश होता. याप्रसंगी संस्थेचे सचिव मनोज शिंपी,खजिनदार हेमंत व्यास, आंबादास सोनार, अशोक सोनटक्के, वृषभ चव्हाण, शुभम शिंदे, विक्रम भाटी, महेश शिंपी, उमेश शिंपी, रमेश अंभोरे, सुरेश आदीवाल, बळीराम साटोटे आदी उपस्थित होते.