सिध्देश्वरनगरात किरकोळ कारणावरुन एकास मारहाण

0

वरणगाव। शहरातील सिध्देश्वरनगरात किरकोळ कारणावरुन आपसाद वाद होऊन झालेल्या मारहाणीत एकाचे डोके फोडल्याची घटना शुक्रवार 7 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन वाद
गिरीष भगवान तायडे (वय 25, रा. सिध्देश्वरनगर, वरणगाव) हा शुक्रवार 7 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारात राहत्या घराजवळच लहान मुले खेळत असल्या ठिकाणी गेला असता. त्याला आकाश कैलास मराठे व कैलास रामचंद्र मराठे (दोघे रा.सिध्देश्वरनगर) यांनी शिवीगाळ केली. गिरीष म्हणाला मला शिवीगाळ का करतो या कारणावरुन दोघांनी चापटा, बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. आकाश यांने खाली पडलेला दगड उचलून गिरीष यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. व तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. म्हणून गिरीष तायडे यांच्या फिर्यादी वरुन वरणगाव पोलिसात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी करीत आहे.