सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत शारापोव्हाला वाइल्ड कार्ड प्रवेश

0

सिनसिनाटी । पाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या रशीयाच्या मारिया शारापोव्हाला 12 ते 20 ऑगस्टपर्यंत रंगणार्‍या सिनसिनाटी डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेची पुर्वतयारी म्हणुन सिनसिनाटी स्पर्धेकडे पाहिले जात आहे. शारापोव्हाच्या जोडीने बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकालाही वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे.

अझारेंकाने प्रसुतीनंतर काही दिवसांपूर्वीच टेनिस कोर्टवर पुनरागमन केले आहे. स्पर्धेचे संचालक आंद्रे सिल्वा म्हणाले की, स्पर्धेतील आव्हान अधिक कठिण करण्यासाठी शारापोव्हा आणि अझारेंकाला वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. या दोघी व्यतिरीक्त आणखी काही चांगले खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत.