जळगाव- उत्तर महाराष्ट्रविद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मतमोजणी सुरू असून आज वैध अवैध मतांची तपासणी करण्यात आली. यात विविध प्रवर्गातून तब्बल 6341 मते अवैध ठरविण्यात आले आहे. यात महिलांची 930, ओबीसी 925, एससी 1181, एसटी 900, एनटी 977 आणि खुला प्रवर्ग 1428 अशी मते अवैध ठरली आहे. या निवडणुकीसाठी एससी सवंर्गासाठी 10 हजार 604 मतदान झाले होते त्यापैकी 9 हजार 472 मते वैध आहेत. जिंकण्यासाठी 4 हजार 762 मतांची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे एसटी संवर्गासाठी 8 हजार 554 मतदान झाले होते. विजयासाठी 4854 मतांची आवश्यकता आहे. निकालाची अजून प्रतिक्षा असून रात्री उशीरापर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.