मुंबई : सध्याचा वादग्रस्त मुद्दा म्हणजे अयोध्येतील राममंदिर. या मुद्द्यावर आधारित राम जन्मभूमी या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अशा धार्मिक वादावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी सेन्सॉर बोर्डाने दिली कशी? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.
त्यामुळे, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. येत्या ४ डिसेंबरला या प्रकरणात प्राथमिक सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्चित केलं आहे. वकील हसनैन काझी यांनी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर केली आहे.