सिनेव्हिस्टा स्टुडिओतील आगीत एकाचा मृत्यू

0

मुंबई : कांजुरमार्ग पश्चिमेला गांधीनगर परिसरातील सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत आगीत एकाचा मृत्यू झाला. गोपी वर्मा असे या तरुणाचे नाव आहे. दुर्दैवी बाब म्हणजे स्टुडिओतून सर्वांना सुखरुप बाहेर काढल्याचा दावा केला जात असतानाच गोपीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आग लागली त्यावेळी स्टुडिओत अंजली या मराठी मालिकेसह एकूण 4 मालिकांचे चित्रिकरण सुरु होते. कलाकारांसह एकूण 150 जण स्टुडिओत उपस्थित होते.

या सर्वांना सुखरुप बाहेर काढल्याची माहिती देण्यात आली होती. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. रविवारी सकाळी स्टुडिओत एक मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटली असून गोपी वर्मा असे त्याचे नाव आहे. तो ऑडिओ असिस्टंट म्हणून काम करत होता.