‘सिमी’ खटल्यात दोघे दोषी जाहीर; आज सुनावणार शिक्षा

0

जळगाव। प्रचंड गाजलेल्या सिमी प्रकरणात संबंधीत संघटनेच्या कार्यकर्त्यावर 2001 मध्ये एमआयडीसी पोलिसात 10 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीपैकी 4 जणांना निर्देष तर 6 जणांना शिक्षा सुनावली होती. यानंतर पुन्हा तपास केला असता यात दोन जणांवर पुरवणी चार्जशिट दाखल करण्यात आली होती. त्यापैकी परवेज खान रिय्याज खान व मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अटक असलेल्या आसिफ खान बशीर खान या दोघांना दि 31 रोजी जळगाव न्यायालयाने कट रचण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून 1 एप्रिल रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

2001 पासून सुरू होता खटला
पोलिस उपअधिक्षक सागर दादाराव आढाव यांनी 28/7/2001 रोजी एमआयडीसी पोलिसात 10 जणांविरूध्द भादवि 153 अ, 120 ब, 34 सह भारताचा स्फोटक विशेष कायदा कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेशन केस क्रमाक 126/2002 नुसार फैजदारी खटला सुरू होता.तत्कालीन न्यायाधिश आर.डी.तायडे यांनी दिलेल्या निकाला नुसार शरीफ खान सफराज खान, शेख सिद्दीकी शेख अजीज, खालील अराद खान अजमल खान, सैय्यद हबीब रजा यांना न्यायालयाने निर्देष सोडले होते.तर याच प्रकरणात शेख शकील अब्दुल अण्णांन याला 3 वर्ष शिक्षा, तर शेख इलियास शेख युसूफ, शेख इरफान अब्दुल रऊफ, शेख रिजवान शेख रशिद, गुलजार अहमद गुलाम मोहम्मद यांना 10 वर्षाची शिक्षा व वकारूल हुसैन मुज्जफर हुसैन याला 7 वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र या दोषी ठरविलेल्या आरोपीनी हायकोर्टात अपील केले होते. त्यावेळी हायकोर्टाने या आरोपींना सोडून दिले होते. तर आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजुद्दीन खान यांच्यावर पुरवणी दोषारोप ठेवले होते.

आज दोषी ठरविले
याप्रकरणात दोन्ही आरोपी जामिनावर होते. मात्र मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात अटक असलेल्या आसिफ खान बशीर खान हा ऑर्थर रोड कारागृहात अंडासेल होता. तेथूनच संशयिताची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून आज कामकाजाला उपस्थिती राहत असे सिमीचे कार्यकर्ते म्हणून पोलिसांनी अटक केलेले आसिफ खान उर्फ जुनेद अब्दूल बशीर खान, परवेझ खान रियाजोद्दीन खान या दोघा संशयितांवर 2006 मध्ये तरुणांच्या बैठका घेत त्यात वादग्रस्त मुद्यांवर मार्गदर्शन करून भडकवण्याचे काम केल्याचा संशय आहे. संशयितांच्या अटकेनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर, साहित्य आढळले होते. या पार्श्‍वभूमीवर संशयितांवर भादंवि कलम-295 अन्वये अतिरिक्त कलम लावण्यात आले आहेत. ऑर्थर रोड कारागृहात अंडासेलमधील संशयित आसिफ व त्याचा साथीदार परवेझ याच्यावर लावण्यात आलेले होते.आसिफ खान बशीर खान यांला 31-12-2006 रोजी अटक करण्यात आली होती. तर परवेज खान याला 23-8-2006 रोजी अटक करण्यात आली होती.दोन्ही आरोपी आज दि.31 रोजी न्यायालयात उपस्थित होते.परवेज खान हा दुपारी 2.15 वाजेलाच न्यायालयात उपस्थित होता.तर न्यायालयाचे कामकाज दुपारी 2.45 वाजेला सुरू झाले.त्यावेळी प्रथम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून येरवडा जेलमध्ये असलेला आरोपी आसिफ खान हा न्यायालयाच्या कामकाजात दुपारी 3.05 वाजेपासून सहभागी झाला.त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून व तो या खटल्यात दोषी आढळल्याचे सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दुपारी 3.25 पर्यंत सुरू होती.