सिमी प्रकरणी 8 मार्चला कामकाज

0

जळगाव । सिमी प्रकरणी दोन्ही पक्षांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश न्यायाधीश पटणी यांनी दिले आहे. सरकारपक्षातर्फे लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी मुदत मिळण्याचा अर्ज जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिला होता.

तो मान्य करीत न्यायाधीश पटणी यांनी पुढील सुनावणी 8 मार्चला ठेवली आहे. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. ए. ए. खान व चौधरी यांनी कामकाज पाहिले.