‘सिम्फनी’ने 10 हजारांचे दिले तीन कोटी

0

मुंबई | ‘सिम्फनी’च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 10 हजारांचे तीन कोटी रुपये कमावून दिले आहेत. म्हणजे तब्बल 2500 पट परतावा या गुंतवणुकीतून मिळालाय. 2001 मध्ये ‘सिम्फनी’च्या एका शेअर्सची किंमत 20 रुपये होती. 20 रुपये दर्शनी मूल्याचा हा शेअर आज 1,455 रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणुकीच्या परिभाषेत तर हा परतावा 2,53,000 टक्के आहे. ज्यांनी 2001 मध्ये ‘सिम्फनी’चे 10 हजार रुपये किंमतीचे शेअर्स घेतले व राखून ठेवले त्याची किंमत आज 2 कोटी 93 लाख इतकी आहे.  मुंबई | ‘सिम्फनी’च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 10 हजारांचे तीन कोटी रुपये कमावून दिले आहेत. म्हणजे तब्बल 2500 पट परतावा या गुंतवणुकीतून मिळालाय. 2001 मध्ये ‘सिम्फनी’च्या एका शेअर्सची किंमत 20 रुपये होती. 20 रुपये दर्शनी मूल्याचा हा शेअर आज 1,455 रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणुकीच्या परिभाषेत तर हा परतावा 2,53,000 टक्के आहे. ज्यांनी 2001 मध्ये ‘सिम्फनी’चे 10 हजार रुपये किंमतीचे शेअर्स घेतले व राखून ठेवले त्याची किंमत आज 2 कोटी 93 लाख इतकी आहे.

60 देशात व्यवसाय 75 वर्षांपासून कूलरनिर्मिती करत असलेल्या अहमदाबाद्मधील या कंपनीचा व्यवसाय आता जगातील 60 देशात फैलावला आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि नामांकित कूलर ब्रांड म्हणून ‘सिम्फनी’ची ओळख आहे. 1994 मध्ये दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई शेअरबाजारात कंपनीने लिस्टिंग केले होते.

नफ्याचे चॉकलेटगुंतवणूकदारांना अशा पराताव्याने मालामाल करणारी ‘सिम्फनी’च फक्त एकमेव कंपनी नाही. आयशर मोटर्स या कंपनीचा शेअरही 1,46,171 टक्के परतावा देत आहे. मुलांसाठी टॉफी, चॉकलेट बनविणाऱ्या ‘बालकृष्ण इंडस्ट्रीज़’चा एक शेअर 2001 मध्ये एक रुपये तीस पैसे दर्शनी मूल्याचा होता. आज त्याची किंमत 1,661 रुपये आहे.
काय आहे मंत्र?शेअर मार्केट गुंतवणूक सल्लागारांच्या मते, गुणवत्ता, टिकावक्षमता आणि प्रगतीची योजना पारखून उत्तम फंडामेंटल असलेल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातून कोणत्याही स्थितीत परतावा मिळाल्याशिवाय राहत नाही.

‘बालकृष्ण इंडस्ट्रीज़’

मध्ये किंमत       रुपये होती 

2001               1.30                  

मध्ये किंमत       रुपये आहे 

2017               1,661