मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ आज रिलीझ झाला आहे. लग्नानंतरचा रणवीरचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीरसोबत सारा अली खानही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
रणवीरची पत्नी दीपिका पदुकोणने हा चित्रपट पाहिला आणि तिला रोहित शेट्टीबरोबर रणवीरच ही अभिमान वाटला. तिने रोहितचं खूप कौतुक केलं. ‘सिम्बा’ ‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटाच्या कथानकावर आधारित आहे.