सिम-आधार फेब्रुवारीपर्यंत करा लिंक

0

नवी दिल्ली । फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडले न गेल्यास व व्हेरिफिकेशन न झाल्यास सिमकार्ड बंद होणार आहे. ज्यांनी मोबाइलचे सिम कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल व कंपनीकडून मेसेज आला असेल तर दुर्लक्ष न करता ही प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे.

सुमारे 100 कोटी ग्राहकांची पडताळणी
ऑरलँडो खोटी कागदपत्रे देऊन सिम कार्ड घेणार्‍यांचे प्रमाण खुपच वाढल्याने आणि त्याद्वारे गुन्हे करण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यासंदर्भात लोकनीती फाउंडेशनने याचिका केली दाखल केली होती. या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी झाली असताना खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार देशातील 100 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

…तर क्रमांक बंद होणार
वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. फेब्रुवारी 2018 पर्यंत जे सिम-आधार लिंक करणार नाहीत, ते क्रमांक बंद केले जातील.