सिरियातील रासायनीक हल्ल्यात 70 ठार

0

दमास्कस । सीरियातील दूमा येथे संशयित रविवारी रासायनिक हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात चिमुकल्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेकांवर उपचार सुरू आहेत. बचाव मोहिम राबविणारी संस्था व्हाइट हेलमेटने ट्वीट करून ही माहिती जाहीर केली. सोबतच कथित रासायनिक हल्ल्यानंतर मृत आणि जखमींचे फोटो सुद्धा पोस्ट केले. पण, कुठल्याही अधिकार्‍याने या हल्ल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला नाही.

अमेरिकेने सिरिया राष्ट्राध्यक्षांना धरले जबाबदार
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या संस्थेची पाठराखण केली. तसेच या कथित रासायनिक हल्ल्यासाठी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद जबाबदार असल्याचे थेट आरोप लावले. एवढेच नव्हे, तर रशियाने सीरियाला बिनशर्त प्रत्येक बाबतीत समर्थन दिले आहे. त्यामुळे, या हल्ल्यासाठी रशिया देखील तितकाच जबाबदार आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सिरियाने आरोप फेटाळले
सीरिया सरकारने मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच असद यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हल्ल्याचा फार्स आणि खोटे नाट्य रचण्यात आले असा दावा सीरिया सरकारने केला