दमास्कस । अमेरिकेचा पाठिंबा असलेला सिरियन डेमोक्रेटिक दल हा कुर्डिशअरब गट सिरीयातील रक्का शहरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरत आहे. इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांना हुसकावून लावण्यात कुर्डिश-अरब गटाने बाजी मारली आहे. इसिसला हा मोठा धक्का मानला जात आहे. रक्का शहराभोवती असलेली रफिकाह तटबंदी भेदण्यात आता यश आले आहे. ब्रेट मॅकगर्क या अमेरिकेच्या इस्लामिक स्टेट विरोधी मोहिमेचे प्रमुखांना या बद्दल समाधान व्यक्त केले आहे. दहशतवाद्यांना धडा शिकवायचा आहे पण 2500 मीटर तटबंदी उद्ध्वस्त करायची नाही, कारण ती ऐतिहासिक आहे, असे सूत्रांनी सांगितले.
शहरात लपलेत 2500 जिहादी
इसिसने शहरातील हॉस्पिटल, शाळा आणि मशिदींचा वापर लपण्यासाठी आणि हल्ले करण्यासाठी केला आहे. रक्का हे शहर जानेवारी 2014 मध्ये इसिसने आपल्या ताब्यात घेतले होते आणि इसिसची खिलाफत गादी म्हणून रक्का मानली जाते. या ठिकाणाहूनच जिहादींच्या युरोपवर हल्ले करण्याच्या योजना तयार होत आणि इसिसचे बंदीवान ओलिस ठेवण्यासाठी रक्काचा उपयोग होत.
नियंत्रणाबाहेर स्थिती
उत्तर कोरियाचा शेजारी असलेल्या चीनला अमेरिका सारखी साकडे घालीत आहे. कारण प्योंग्यांग सोबत राजनैतिक संबंध असलेल्या मोजक्या देशापैकी एक चीन आहे. चीन को रियाकडे शब्द टाकतोय पण त्याचा काहीच उपयोग होत नाही, असे भाष्य ट्रम्प करीत आहेत. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत लिउ जिएयी यांनी तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे.