सिलिंडर दरवाढीचा निर्णय मागे

0

नवी दिल्ली : दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय गुरूवारी केंद्र सरकारने मागे घेतला. गरीबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देण्याच्या उज्ज्वला योजनेच्या उलट हा निर्णय असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला.

जून 2016 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात 4 रुपयांनी वाढ करण्याचे आदेश दिले होते. गॅस सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान हळूहळू रद्द करण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु, कंपन्यांना देण्यात आलेल्या दरवाढीचा आदेश सरकारने ऑक्टोबरमध्ये परत घेतला होता. यामुळेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही.