सिलीकॉन व्हॅलीत विद्यार्थ्यांना मुलाखतीविषयी व्याख्यान

0

जळगाव। सिलीकॉन व्हॅली जळगाव येथे मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नोकरीसाठी जातांना रिझूम कसा तयार करावा, मुलाखतीला कसे सामोरे जाण्याकरीता कशी तयारी करावी याविषयी शारदा तुषार जडे, मुंबई सिलीकॉन व्हॅलीच्या सेंटर हेड प्रतिभा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, शिक्षण आणि नोकरी यांना जोडणारा दुवा म्हणजे मुलाखत असल्याने त्याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मागदर्शनाची गरज असते, असे मत प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींवर मात कशी करता येईल याबाबतही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास, भाषा शैली, शरीराची ठेवण याचा कसा उपयोग होतो हे पटवून सांगितले. त्यानंतर कंपनीत नियुक्ती झाल्यानंतर कशा स्वरुपाचे काम करावे लागते, कंपनीचे नियम काय असतात, कंपनीमध्ये कायम नियुक्ती कशी मिळते याबाबत सविस्तर माहितीदेखील यावेळी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले.