जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्वचा रोग ओपीडी मधील दोन कनिष्ठ निवासी डॉक्टरांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. यामुळे या ओपीडी मध्ये डॉक्टरांची शोधाशोध सुरू झाली आहे. व डॉक्टर उपलब्ध न झाल्यास ओपीडी बंद देखील पडू शकते.
त्यातील एक डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाऊराव नाखले यांना निवेदन दिले आहे.
त्वचा रोग व गुप्तरोग विभागात दोन ते तीन महिन्यापूर्वी काही अत्याधुनिक मशिनरी घेण्यात आली होती. या मशनरी मुळे रुग्णांना दिलासा देखील मिळत आहे मात्र मशीनची हाताळण्यासाठी डॉक्टर नसतील तर या मशिनरी पडून राहतील असेही सांगण्यात येत आहे.