नेरुळ : सिवूड्स सेक्टर 40 येथील पदपथावर गेले दोन ते तीन दिवस झाडांच्या छाटणी केलेल्या फांद्या पडलेल्या आहेत. या झाडांच्या फांद्यांमुळे संपूर्ण पदपथ व्यपला गेला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यातच या फांद्या येथे असलेल्या दुकानासमोर पडलेल्या असल्याने येथे येणार्या ग्राहकांना देखील त्रास होत आहे. नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क केलेल्या असल्याने नागरिकांना रस्त्याच्या मधूनन चालावे लागत आहे.
बस थांब्यावर थांबणार्या नागरिकांना होतोय त्रास
पदपथावरच या फांद्या पडलेल्या असल्याने त्या पाण्यामुळे कुजून त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे याबाजूला असलेल्या बस थांब्यावर थांबणार्या नागरिकांना व दुकानदारांना नाकाला रुमाल लावून येथे थांबावे लागत आहे. त्यामुळे पालिका छाटणी केलेल्या फांद्या त्याचवेळेस का उचलत नाही असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. कित्येक ठिकाणी छाटणी केलेल्या फांद्या किंवा वार्यामुळे पडलेल्या फांद्या तशाच पडलेल्या पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्यामुळे पडलेल्या फांद्यांकडे पाहायला व त्या उचलून रस्ते मोकळे करायला पालिकेत वेळच मिळत नसल्याचे यानिमित्ताने समोर आलेले आहे.
या बस थांब्यावर आम्ही नेहमी बसची वाट पाहत असतो. मात्र काही दिवसांपूर्वी येथे पडलेल्या फांद्या अजूनही तशाच आहेत. त्या पदपथावर पडलेल्या असल्याने आम्हाला रस्त्यावरून चालावे लागत आहे.पालिकेने तातडीने येथील फांद्या हटवण्याची गरज आहे.
– ऋजुता सुळे, नागरिक सिवूड्स