सिवूडसमध्ये वॉकेथॉन उत्साहात

0

नेरुळ । माजीमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सीवुड्समध्ये प्रथमच नगरसेवक विशाल डोळस आणि संकंल्प स्पोर्ट्स ऑर्गेनाइजेशनच्या वतीने संयुक्तरित्या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 350 स्पर्धकांनी भाग घेतला. ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला वर्ग तसेच लहान मुलेे सहभागी झाले होते. विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सीवुड्समधल्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर स्पर्धेत भाग घेतलेले 71 व 80 वर्षाचे ज्येष्ठ आणि नागरिक स्पर्धेचे आकर्षण ठरले. यावेळी चारही गटांतील विजेत्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक तसेच चषक देण्यात आले.