जळगाव। येथील सिव्हील इंजिनीअर्स असोसिएशनच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सचिवपदी मिलींद काळे यांची निवड करण्यात आली. आदर्श नगर मधील लायन्स हॉल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष मिलींद राठी, मावळते सचिव प्रमोद माळी, कोषाध्य राहूल पवार यांच्यासह सर्व सभासदांची उपस्थिती होती. सभेत गतवर्षाचा आढावा, इतिवृत्तास मंजुरी, सभासद कल्याणकारी योजना, आगामी उपक्रम या विषयांवर चर्चा करण्यात आली. इंजिनीयर डे, अभ्यास सहल, किक्रेट सामने आयोजनाबाबत निर्णय घेण्यात आला. असोसिएशनचे मार्गदर्शक भरत अमळकर यांनी सिव्हील इंजिनियर्स व्यक्तींनी बांधकाम क्षेत्रात काम करतांना पाणी बचत, वृक्षारोपण, पाणी पुर्नभरणासह पर्यावरण सर्ंवधन करावे असे आवाहन केले. सुत्रसंचालन सुनील याज्ञिक यांनी केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.