सिसोदियांच्या घरावर सीबीआयचा छापा

0

नवी दिल्ली : सीबीआयने आपचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापा टाकला. टॉक टू ए केच्या कार्यक्रमाविषयी सिसोदिया यांच्यावर आरोप असून यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीचे अधिकारी मनिष सिसोदिया यांचा जबाब घेण्यासाठी गेले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या संबंधीची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्ता अरूणोदय प्रकाश यांनी दिली आहे. टॉक टू ए के कार्यक्रम म्हणजे टॉक टू अरविंद केजरीवाल या कार्यक्रमासाठी मनिष सिसोदिया यांनी सरकारकडून येणारा निधी वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधीची तक्रार उपराज्यपाल यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार उपराज्यपालांनी ईडीला चौकशी करण्याचे आदेश दिले.

कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी वापरला पैसा
जुलै 2016 मध्ये टॉक टू अरविंद केजरीवाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. नियमानुसार या क्रार्यक्रमाच्या प्रचारासाठी एका कंपनीला जाहिरात करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी जवळ-जवळ दीड कोटी रूपये लागले होते. याची कार्यक्रमाची सर्व जबाबदारी मनिष सिसोदिया यांची होती.