नवी दिल्ली: गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी (सीआरपीएफ) दिलासादायक निर्णय घेतला आहे. सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या कमांडंट दर्जापर्यंतच्या सर्वांसाठी रेशन भत्ता देण्यास गृह मंत्रालयाने सहमती दिली आहे. याबाबतचे वृत्त एएनआने दिले आहे.
यापूर्वी गृह मंत्रालयाने सीआरपीएफजवळ रेशन निधी उपलब्ध नसल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या होत्या, त्यामुळे सरकारवर बरीच टीका देखील झाली होती. हे वृत्त आता फेटाळण्यात आले आहे. केंद्रीय गृह खात्याकडून जुलै महिन्यासाठी दोन लाखांहून अधिक जवानांना रेशन निधीचे वाटप करण्यात आल्याचं स्पष्टीकरण गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते. केंद्रीय गृह खात्याकडून १२ जुलै रोजी प्रत्येक जवानाला आधीच्या शिल्लक रकमेपोटी २२ हजार १९४ रुपये रेशन निधी देण्यात आला. हा निधी जवळजवळ दोन लाख जवानांना वितरित करण्यात आला असे गृहमंत्रालयाने सांगितले होते.