सीआरपीएफच्या 400 जवानांना अन्नातून विषबाधा

0

नवी दिल्ली । केंद्रीय राखवी पोलीस दलाच्या तब्बल 400 जवानांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधील थिरुवनंतपुरमच्या पल्लीपुरम इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलीस दलाच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांना अन्न घेतल्यानंतर काही काळाने पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी कली असता त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तातडीची उपाययोजना म्हणून जवानांवर उपचार सुरू करण्यात आले. विषबाधा झालेल्या एकूण 400 जवानांपैकी 1089 जवानांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या देखरखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शनिवारी रात्री त्यांनी जवानांवर उपचार सुरू असलेल्या रूग्णालयाला भेट दिली.

मंगलपुरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या जवानांपैकी सर्वांची प्रकृती नियंत्रणात असून, कोणत्याही जवानाची प्रकृती गंभीर नाही. जवानांना जेवणासाठी बाहेरून मासे आणले होते. या माशांमधूनच विषबाधा झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जवानांची स्थिती पाहून त्यांच्यावर दोन रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्या जवानांवर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासोबतच ए. जी. रुग्णालयातही उपचार सुरु आहेत. तर काही जवानांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावरच उपचार करण्यात आले आहेत.

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांना विषबाधा झाल्यामुळे तर्कवितर्क आणि चर्चांना उत आला आहे. काहींच्या मते ही नजरचुक आणि निष्काळजीपणामुळे घडलेली घटना आहे. तर, हा घातपाताचा प्रकार असावा असे कांहींचे म्हणने आहे. दरम्यान, अद्याप चौकशी सुरू असून, पूर्ण चौकशी झाल्यावरच सत्य बाहेर येणार आहे.