श्रीनगर। दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. श्रीनगर – जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंथा चौक येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक पोलीस उपनिरिक्षक शहीद झाला असून दोन जखमी झाले आहेत. यानंतर प्रत्युत्तरादाखल केंद्रीय राखीव पोलीस दलानेही गोळीबार केला.
डीपीएस शाळेचा दहशतवाद्यांनी घेतला ताबा
श्रीनगरच्या पांथा चौकात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या हल्ल्यात सीआरएफचे पोलीस उप निरीक्षक शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहे. यानंतर प्रत्युत्तरादाखल केंद्रीय राखीव पोलीस दलानेही गोळीबार केला. ज्यानंतर दहशतवादी डीपीएस शाळेत घुसले आणि त्यांनी शाळेचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांनी या शाळेला वेढा दिला. त्या शाळेत एकही विद्यार्थी आणि शिक्षक नाही. या दहशतवाद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे.
वीर जवानांना निरोप
पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप जाधव व श्रावण माने यांच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात झाले. यावेळी केळगावावर शोककळा पसरली होती. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावरही सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात या वीर जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला.