इनामदार व चड्डा सायन्स अॅकॅडमीचा विद्यार्थी
पिंपरी : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल शनिवारी रात्री उशिरा ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सीईटी-अभियांत्रिकी गटात पिंपरी-चिंचवड शहरातील रुचीरंक संजय पाटील याने 200 पैकी 191 गुण मिळवीत राज्यात द्वितीय क्रमांक तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
अभियांत्रिकी व औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दोन जून रात्री नऊ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या हीींिं:ुुु.वींशारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/ाहींलशीं 2018 या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत बिजलीनगर, चिंचवडमधील रुचीरंक पाटील याने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तो निगडीतील अमृता विद्यालयात बारावीत शिकत आहे. त्याने गणित विषयात 100 पैकी 98 गुण, भौतिकशास्त्रामध्ये 50 पैकी 47, रसायनशास्त्रामध्ये 50 पैकी 46 गुण मिळवले आहेत. त्याचे वडील सिव्हिल कॉन्ट्रक्टर, तर आई सोनल गृहिणी आहेत.
केवळ घोकंपट्टी केली नाही
या यशाविषयी रुचीरंक म्हणाला, ‘मी नियमित कॉलेज केले. त्यानंतर इनामदार आणि चड्डा सायन्स अॅकॅडमीमध्ये शिक्षण घेतले. दररोज कॉलेज आणि क्लासमध्ये सहा ते सात तास अभ्यासाला वेळ दिला. घोकंपट्टी न करता विषयांच्या कन्सेप्ट समजून घेतल्या. त्याचा फायदा झाला. करिअरचा फोकस स्पष्ट असल्याने त्याने अकरावीपासून सीईटी परीक्षेची तयारी केल्याचे त्याचे मार्गदर्शक नरेश चड्डा व संजय इनामदार व सावंत यांनी सांगितले.