मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी आज सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. यातून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याचे समोर आले आहे. राज्याचा विकास दर ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात कृषी विकास दर ३.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यावरून राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे समोर आले आहे.
उद्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा आहे.