सीएए आणि सीएबी कायदा रद्द करण्यासाठी ‘गांधी शांती यात्रा’ ः यशवंत सिन्हा

0

‘गांधी शांती यात्रे’चे पिंपरीत जोरदार स्वागत

पिंपरी चिंचवड : नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी “गांधी शांती यात्रा’’ सुरु करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींचे आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून “गांधी शांती यात्रा’’ सुरु करण्यात आली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा सरकारने आणला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. गुरुवारी (दि.9) मुंबई येथून निघालेल्या ‘गांधी शांती यात्रेचे’ स्वागत निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

यात्रेचे यांनी केले स्वागत…
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला काँग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, निगार बारसकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, सुनील शिंदे, सुनील शिर्के, देवानंद बांदल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, सुनील राऊत, हिरामण खवळे, बाबा बनसोडे, किशोर कळसकर, संदेश नवले, आबा खराडे, कुंदन कसबे, मिना गायकवाड, आशा गायकवाड, संदेश बोर्डे, भाऊसाहेब मुगुटमल, सतीश भोसले, महादेव पुरी, सुनीन नेटके, वैभव किरवे, चंद्रशेखर जाधव, संजय बालगुडे, सतीश चव्हाण, विनायक जाधव, सुनील शेंडे, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.