सीएच्या परीक्षेत डोंबिवली अव्वल

0

कल्याण : सुशिक्षित आणि सुसंकृत अशी ख्याती असणाऱ्या डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे .सी ए च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत डोंबिवलीकर राज परेश शेठ याने 800 पैकी 630 गुण मिळवत राज्यात नाही तर देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे .निकाल जाहीर होताच संपूर्ण डोंबिवलीतून राज वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

डोंबिवली पश्चिमेकडील फुले रोड वरील महालक्ष्मी आपर्टमेंट मध्ये आपले वडील परेश व आई जोत्स्ना आणि दोन बहिणीसह राहतो .राज चे वडील परेश हे मुंबई येथे एका ठिकाणी खाजगी नोकरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .राज चे शालेय शिक्षण डोंबिवलीतील विद्यानिकेत शाळेत झाले त्याला दहावी मध्ये ही 95.27 गुण मिळाले होते त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्याने माटुंगा येथील पोद्दार कॉलेज मध्ये घेतले .11 वि पासून त्याने सीए व्हायचे स्वप्न उराशी बाळगले होते .या ध्येयाने पछाडलेल्या राजने दिवस रात्र मेहनत सुरू केली .परीक्षेला तीन महिन्याचा कालावधी असताना तर दिवसाच्या 12 तास त्याने अभ्यास केला होता .संपूर्ण तयारीनिशी तो मे मध्ये झालेल्या सी ए च्या परीक्षेला सामोरे गेला होता .आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी राज ही एका खासगी कंपनी मध्ये नोकरी करत होता .आज सकाळी नेहमीप्रमाने कामावर। गेला असताना त्याचे कार्यलय प्रमुखांनी आपल्याला आपण देशात प्रथम आल्याचे सांगितले .निकाल ऐकल्यानंतर राज च्या आनंदला पारावार उरला नाही त्याने याबाबत आपल्या आई वडिलांना सांगितले .आपला मुलगा देशात पहिला आल्याचे माहीत झाल्या नंतर त्यांना ही प्रचंड आनंद झाला .यावेळी राजने मला हे यश माझे शिक्षकानी ,आई वडिलांनी ,मित्रांनी वेळोवेळी केलेल्या मारदर्शनामुळे मिळाल्याचे सांगितले .दरम्यान ही बातमी डोंबिवलीत वाऱ्यासारखी पसरली .डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी राज च्या घरी जाऊन त्याची भेट घेत त्याचे व त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .तर इतर मान्यवरांनी ही राज ला शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती .