सीएम चषकामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य-देश स्तरावर संधी

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे ; मुक्ताईनगरला सीएम स्पर्धेचे बक्षीस वितरण

मुक्ताईनगर- सीएम चषकातून विविध खेळ कला यातील ग्रामीण भागातील नवोदित खेळाडू कलावंत यांच्यामधील कौशल्य समोर आले. खेळ खेळल्यामुळे कौशल्य विकसित होतात. शारीरिक व्यायाम झाल्यामुळे शरीर निरोगी निकोप राहते, कलागुणांना वाव मिळतो, खेळ खेळायला वयाची मर्यादा नसते. भरपूर खेळा यातून स्वत:सह देशाचे नाव मोठे करा, सीएम चषकातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य तसेच देश पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याची भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आयोजित मुख्यमंत्री सीएम चषकाचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात आयोजन करण्यात आले. त्यातील यशस्वी स्पर्धकांसह संघांना शनिवारी गौरवण्यात आले. प्रसंगी माजी मंत्री खडसे बोलत होते.

अपयशाने खचून जावू नये -एकनाथराव खडसे
माजी मंत्री खडसे पुढे म्हणाले की, खेळातून जीवनात प्रेरणा मिळते. खेळात यश आले तर हुरळून जाऊ नये, अपयश मिळाले तर खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावा व हेच तत्त्व जीवनात अंगीकारावे. खेळात सातत्य ठेवावे. प्रतिस्पर्ध्याचा द्वेष न करता त्याच्या सोबत निकोप स्पर्धा करावी.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, नगराध्यक्ष नजमा तडवी, प्राचार्य व्ही. आर. पाटील, एस. एम. पाटील, जिल्हा परीषद सदस्य नीलेश पाटील, वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, चंद्रकांत भोलाणे, प्रदीप साळुंखे, स्पर्धा संयोजक ललित महाजन, स्पर्धा संरक्षक संदीप देशमुख, नगरसेवक पियुष महाजन, मुकेश वानखेडे, बापू ससाणे, भाजयुमोचे विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, पांडुरंग नाफडे, भय्या पाटील, प्रवीण पाटील, आम्रपाली पाटील, सचिन पाटील, मुन्ना बोंडे, संजय माळी, संजीव वाढे, संजय कपले, संजय निकम, प्रियंका चौधरी उपस्थित होते. यावेळी गणेश घटे, संजय माळी, राहुल गोसावी, हभप भाऊराव महाराज, अजय महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धा संयोजक संदीप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संजय निकम यांनी आभार मानले.