सीएम चषक धावण्याच्या स्पर्धेत आमदार हरले, कन्या जिंकली !

0

सात हजार विद्यार्थी सहभागी

चाळीसगाव- राज्यस्तरीय सीएम चषक स्पर्धेत चाळीसगाव तालुक्याची जिल्ह्यात पहिला तर राज्यात टॉप टेनकडे घौडदौड सुरू असुन आज धुळे रोड वरील कॉलेज ट्रक वर झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत सात हजार विद्यार्थी सहभागी झाले. अचानक अपेक्षेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाल्याने आयोजकांची मोठी धावपळ उडाली. संयोजकांनी आमदार उन्मेश पाटील, त्यांचे चिरंजीव स्वामी समर्थ व मुलगी सुष्टी यांच्यात सामना घेतला यात कन्या सृष्टीने आमदार उन्मेश पाटील यांना हरविले. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सीएम चषक स्पर्धेत आज धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात शंभर व चारशे मीटर अशा दोन प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. विशेषबाब म्हणजे दोन हजार मुलींनी सहभाग नोंदवला. तालुक्यात क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यात जेष्ठ क्रीडा शिक्षक वाय.एम.चव्हाण, अजय देशमुख, युवराज भोसले, राहुल साळुंखे, योगेश साळुंखे, सुदेश दराडे, तुषार निकम, खुशाल देशमुख, हेमंत गोरे, विवेक निकम, प्रवीण राजपूत, संजय राजपूत, प्रशांत पाटील, अविनाश घुगे या क्रीडा शिक्षकांनी स्पर्धा घेतली.

खेळाडूवृत्ती सोबत शिस्तीचे धडे
स्पर्धेनंतर स्पर्धकांनीच स्वच्छता केली. आमदार उन्मेश पाटील, स्पर्धक व क्रीडा शिक्षक, कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी स्वच्छता केली. यावेळी खेळाडूवृत्तीबरोबरच शिस्तीचे दर्शन पाहायला मिळाले.

यांनी घेतले परिश्रम
भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, स्पर्धा समन्वयक सचिन पवार, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, अजय जोशी, नरेन जैन, जितेंद्र वाघ, समकित छाजेड, पं.स.सदस्य भाऊसाहेब पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय मराठे, बबडी शेख, प्रा.रवींद्र पाटील, अमोल चव्हाण, पप्पू राजपूत, विनायक वाघ, जितेंद्र पाटील, चेतन वाघ, हर्षल चौधरी, कपिल पाटील, मनोज पाटील, बंडू पगार, विजय पांगारे, इमरान शेख, अतुल चव्हाण, संदीप गवळी, यांच्यासह शांतादेवी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य दिपक पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.