सीए रविंद्र खैरनार यांना पी.एचडी. प्रदान

0

जळगाव । येथील प्रख्यात सीए रविंद्र खैरनार यांनी ‘अ स्टडी ऑफ द पब्लीक ट्रस्ट इन जलगाव डीस्ट्रीक्ट’ या विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पी.एचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. पी टी चौधरी, डॉ. संजय शेखावत, प्रा. यशवंत सैंदाणे यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या पी.एचडीच्या माध्यमातून जळगाव जिल्हयातील पब्लीक ट्रस्टच्या फायनांन्स टॅक्स, याबाबतच्या व्यवस्थापनाचा त्यांनी सखोल अभ्यास करत पी एच डी प्राप्त केली आहे.गोदावरी फाउंडेशन व इतर अनेक संस्थावर लेखा परिक्षणाचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे वरीष्ठ लेखापाल योगेश पाटील, यांनी सीए खैरनार यांचा सत्कार केला. डॉ. खैरनार यांच्यावर विविध संस्थातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खैरनार यांनी धर्मदाय संस्था व ट्रस्ट 1950 व 1860 अन्वये स्थापन संस्थांचा अभ्यास केला.