शिरपूर। सी सीड इन्फोटेक लिमिटेड पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सीड आय. टी. आयडॉल 2017 स्पर्धेत येथील आर सी पटेल अभियांत्रीकीच्या संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थिनींनीप्रथम व तृतीय पारितोषिक पटकाविले असुन पुणे येथे आयोजित होणार्या महा-सीड आयडॉलसाठी त्यांचीनिवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.जे बी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्यकारी अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी अभिनंदन केले.
यांचा झाला गौरव: याव्यतिरिक्त आकाश सिसोदिया, सुमीत अग्रवाल , श्वेता महाजन, मित्ताली सुगंधी, श्रेया दायमा, हिमेश भंडारी ,निधी गुप्ता, धीरज सोरटे, आकाश रणदिवे, स्नेहल मोरे, सविता पाटील, सुशांत चव्हाण, माधुरी हिरे, मेघना चौधरी, सिमरन माखीजा, कुणाल वानखेडे, त्रीलोक्यानाथ वाघ याविद्यार्थ्यांना टॉप फिफ्टी मेरीट मेडल अवार्डच्या अंतर्गत गौरविण्यात आले. संयोजक म्हणून प्रा.संदीप सोनवणे यांनी काम पहिले. प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. जे. देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. नितीन पाटील, प्रा. व्हि. एस. पाटील, प्रा. डी. आर. पाटील, प्रा.डी.एस.लाल, रजिस्ट्रार प्रशांत महाजन, टी. पी. प्रमुख प्रा. मिल्केश जैन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सी, सीप्लस प्लस भाषेची स्पर्धा
सीड इन्फोटेक प्रा.ली.पुणे हि नामांकित ट्रेनिंग संस्था असून या द्वारेसंगणक उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त असे व्यावसायिक व जॉब ओरीयंटेड कोर्सेस घेतले जातात. विद्यार्थ्यांनी सी, सी प्लस प्लस प्रोग्रामिंग भाषांमध्ये विद्यार्थी निपुण होण्यासाठी सीड मार्फत दर वर्षी अशा स्वरूपाच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी विविध महाविद्यालयांमधून 1600 तर आर. सी. पटेल अभियांत्रीकी मधुन 708 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.