सीबीआयचा दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर छापा

0

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी सोमवारी सीबीआयने छापा टाकला. मनी लाँडरिंगप्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली. या कारवाईप्रकरणी मात्र ‘आप’चे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकार सीबीआयच्या माध्यमातून त्रास देत असल्याचा आरोप केला. पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा यामागील प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

जैन यांच्या ज्या कर्मचार्‍यांवर हवालाचे आरोप करण्यात आले आहेत, ते मुळातच अस्तित्वातच नाहीत. प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयला अजूनही त्या व्यक्ती यांना समोर आणत नाही. ज्या क्रमांकावरून हवाला व्यापार्‍यांना फोन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तेही दूरध्वनी क्रमांत मागील दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे त्यांचा ‘कॉल रेकॉर्ड’ंही नाही, असा खुलासा ‘आप’ने केला आहे. सीबीआयकडून जैन यांची सलग दोन दिवस चौकशी आली. एप्रिल महिन्यात जैन यांच्याविरोधात तपास सुरू केला होता तसेच त्यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे. त्यांना कोलकाताची कंपनी प्रयास इन्फो प्रायव्हेट लि. अकिचंद डेव्हल्पर्स तसेच मेघालय प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. च्या माध्यमातून गुन्हयात सहभागी असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.