सीबीआय वाद: आलोक वर्मा यांच्या याचिकेवर पुढील मंगळवारी सुनावणी

0

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सीबीआय विरुद्ध सीबीआय असा वाद सुरु आहे. सीबीआयच्या कामकाजात केंद्राने हस्तक्षेप केले आहे. संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याप्रकरणी वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती, त्यात पुढील मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

सीबीआयमधील अंतर्गत वादावर सीव्हीसीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या विवादावर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी सुटीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आलोक वर्माना या आदेशावरील स्पष्टीकरण सीलबंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राकेश अस्थाना यांना सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.