सीबीएसईत क्षितीज जिल्ह्यात प्रथम

0

जळगाव । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल शनिवारी दुपारी 12.30 वाजता संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला. जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, रूस्तमजी इंटरनॅशनल, ओरियन सीबीएसई स्कुल, गोदावरी सीबीएसई स्कुल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात बारावीच्या परीक्षेत रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी क्षितीज प्रसाद जगताप याने सर्वाधिक 96.2 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिला आहे.

विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता
शनिवारी निकाल लागणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागलेली होती. अखेर दुपारी साडेबारा वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर निकाल जाहिर झाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक संकेतस्थळावर निकाल पाहत असताना वेबसाईडला मोठ्या प्रमाणावर अडचण झाली होती झाली़ तब्बल एक तासापर्यंत निकाल पाहता आला नाही़ त्यानंतर वेबसाईड ही सुरळीत झाली़

तीन शाळेचा निकाल 100 टक्के
शहरातील रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, गोदावरी सीबीएसई स्कूल, ओरीयन स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मार्च व एप्रिल महिन्यात बारावीची परीक्षा दिली होती. यामधील गोदावरी, सेंट जोसेफ व केंद्रीय महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, रूस्तमजीच्या क्षितीज जगताप याने 96.2 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान पटकाविला असून सेंट जोसेफच्या मलोनी दीपक अटल या विद्यार्थीनीने 95़4 गुण प्राप्त करत दुसरी ठरली आहे़

दुपारी लागला निकाल
बारावी सीबीएसई परिक्षेचा निकाल दुपारी साडेबाराला ऑनलाईन जाहिर झाला. मात्र, अनेकजण निकाल पाहत असल्याने वेबसाईट हँग झाली होती. यामुळे निकाल पाहण्यास अडचणी येत होत्या. एक ते दीड तासानंतर निकाल दिसू लागला होता. जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, रूस्तमजी इंटरनॅशनल, ओरियन सीबीएसई स्कुल, गोदावरी सीबीएसई स्कुल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

शाळानिहाय निकाल याप्रमाणे
रुस्तमजी इंटरनॅलनल स्कूलमधील क्षितीज प्रसाद जगताप या विद्यार्थ्याने 96.2 टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. साक्षी रवींद्र राणे 92.8 टक्के गुण मिळवून द्वितीय तर दिक्क्षा सुनील चारेडिया हिने 92.2 टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला आहे.
सेंट जोसेफ स्कूलमधील मिलोनी दीपक अटल हिने 95.4 टक्के गुण मिळवून प्रथम तर अजिंक्य संजय पाटील 94 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तर वंक्षिका सुनील मधांन 85.2 टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे.
ओरियन विद्यालयातून पुजा संजय थोरात हिने 90.4 टक्के मिळवून प्रथम तर मानसी मनोज महाजन हिने 90.2 टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच नंदिनी विजय भन्साली हिने 84़ 6 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.
केंद्रीय विद्यालयातून रोशन झाल्टे 87 टक्के गुण मिळवित प्रथम तर अमेय रामटेके 79 टक्के मिळवून द्वितीय व अपूर्वा दामले 78 टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे़
गोदावरी सीबीएसई विद्यालयाचा 12 वीचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. यात डॉ़ जयंत लाठी यांचे चिरंजीव अमेय लाठी यास 89.4 टक्के मिळवत शाळेतून प्रथम तर 85.4 टक्के मिळवत डॉ़ अनिल पाटील यांचे चिरंजीव आदित्य पाटील द्वितीय तर 78.8 टक्के मिळवत डॉ. प्रशांत जाधव यांचे चिरजीव सिध्दांत जाधव तृतीय क्रमाकांने उर्तीण झाला आहे. 100 टक्के निकाल लागल्याने शाळेत जल्लोष झाला. गोदावरी फॉऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.