नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्णय झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९९.३७ आहे. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर पाहू शकता. तसेच SMS, IVRS आणि UMANG अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकता.
देशभरातून एकूण १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थी नियमित तर ६० हजार ४४३ विद्यार्थी खासगीरित्या नोंदणीकृत होते. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
या वेबसाइटवर पाहता येतील निकाल
cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in
असा तपासा निकाल
– बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा.
-या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.
-तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
-भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घेऊन ठेवा.