नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, डेहराडून आणि त्रिवेंद्रम आदी विभागांचे सीबीएसईचे इयत्ता10 व्या परीक्षांचे निकाल जाहिर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेचा टक्का घसरला. गेल्यावर्षी 96.21 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर, यंदा 90.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात एकूण परीक्षार्थींमध्ये विद्यार्थिर्नींच्या तुलनेत विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5 टक्क्यांनी घसरली. त्रिवेंद्रमच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. त्रिवेंद्रम विभागात 99.85 टक्केविद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्रिवेंद्रमने पहिला तर, 99.62 टक्के विर्द्यार्थी उत्तीर्ण करत चेन्नईने दुसरा क्रमांक पटकावला. अलाहबाद 98.23% मिळवत तिसर्या क्रमांकावर राहिले तर, दिल्ली अगदीच तळाला गेली. दिल्ली विभागातून 78.09% विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले. दिल्लीचा यंदाचा परफॉर्मन्स गेल्यावर्षीच्या तुलनेत 13%नी घसरला. सीबीएसईशी संलग्न असलेल्यासुमारे 16,000 शाळांमधून तब्बल 16,67,573 विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली. प्रतीवर्षीच्या तुलनेत यंदा 10वीचे निकाल उशीरा लागले. काही राज्यांमध्ये असलेल्या राजकीय निवडणुका तसेच मॉडरेशन पॉलिसी आदी कारणांमुळे निर्माण झालेले वाद यांमुळे यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. मागील वर्षी 2015-16 मध्येही मे महिन्याच्या 28 तारखेलाच सीबीएसईचा इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. गेल्यावर्षी 96.36 टक्क्यांनी उत्तीर्ण होत मुलींनी बाजी मारली होती. तर, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 96.11 टक्के इतकी होती.
सीबीएसई मंडळ टक्केवारी
त्रिवेंद्रम – 99.85%
चेन्नई – 99.62%
अलाहाबाद – 98.23%
दिल्ली – 78.09%