सीमारेषेवर लष्कराच्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

0

जम्मू – लष्कराने राबविलेल्या शोधमोहिमेत हत्यारे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यात सीमारेषे जवळ भारतीय लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील झांजर सेक्टरमध्ये काही दिवसापूर्वी दहशतवाद्यांकडून एका भारतीय सैन्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर भारतीय सैन्याकडून या भागात जोरदार शोधमोहिम सुरु होती. हत्या झालेला सैनिक दहशतवाद्यांकडून होणाऱ्या सिमारेषेवरील घुसखोरीला विरोध करत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा शस्त्रसाठा सापडला तो भाग जंगलानी वेढलेला आहे.