नवी दिल्ली : भारतीय लष्कर सीमेवर होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या कारवाईसाठी सदैव तयार आहे. कोणी काहीही म्हणो त्याचा लष्करावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना उत्तर कमांडचे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. जन. रणबीर सिंग यांनी म्हंटले आहे.
I assure you that the Indian Army is fully prepared. When required any challenging task can be undertaken. It doesn't matter as to what statements are being made from what quarter: GOC Northern Command, Lt Gen Ranbir Singh on Pakistan warns India of 10 surgical strikes pic.twitter.com/1cpv9fG1NL
— ANI (@ANI) October 17, 2018
As per inputs available to us, there is no change in terrorist infrastructure across the LoC in Pakistan Occupied Kashmir, and therefore we keep having several reports of infiltration attempts by Pakistan trained terrorists: GOC Northern Command, Lt Gen Ranbir Singh pic.twitter.com/FebRDcLGXK
— ANI (@ANI) October 17, 2018
रणबीर सिंग म्हणाले, घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर विविध भागात वीजवाहक तारांचे कुंपण आहेत. या वीजवाहक कुंपणाचा चांगला परिणाम होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशती कारवाया आणि घुसखोरांना रोखण्यात आपल्याला यश आले आहे.
लष्काराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अजून कुठलाही बदल झाला नाही. दहशतवादी कारयावांसाठी त्यांना पाककडून पैसा पुरवला जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानमधून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या घुसखोरांना रोखण्यात अडचणी येत आहेत. याला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार आहे असेही ले. जन. रणबीर सिंग यावेळी यांनी सांगितले.