सीसीआय केंद्रांवर १०० वाहनांची मोजणी करा

0

शिंदखेडा: सीसीआय तर्फे जिल्ह्यात पाच केंद्रावर कापुस खरेदी सुरू आहे. सर्व ठिकाणी अतिशय संथगतीने कापुस मोजमाप होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका उपनिबंधक एस.एस. गिते यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिवसाला एका केंद्रांवर १०० वाहनांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

खरिप हंगामाची पुर्व तयारी सुरु असताना मागील कापुस मोजमापअभावी घरात पडुन असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सीसीआय केंद्रावर सध्या एका दिवसाला ३० ते ३५ वाहनांची मोजणी होत आहे. त्यामुळे आपला कापुस मोजला जाईल का नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या पार्श्र्वभूमीवर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी तालुका उपनिबंधकांनी सीसीआयचे अधिकारी व जिनींग मालक यांच्याशी त्वरित संपर्क साधला. वाहनांची संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करा, जिनींग मालक व सीसीआयचे अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

*मका खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करा*

माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी मक्का खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंती केली. यावेळी शाम सनेर म्हणाले, मक्का उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यातून १२०० शेतकऱ्यांनी नोंद केली असून त्याचा कार्यालयामार्फत आँनलाईन नोंदणी संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. प्रत्यक्षात मोजणी सुरू नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. यामुळे तातडीने मका खरेदी सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे.

शिष्टमंडळात धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, माजी आमदार रामकृष्ण पाटील, चौधरी, राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील,पांडुरंग माळी, सुनील गागरे, नरेंद्र पाटील,  अहिरे, आबा मुंडे, शामकांत पाटील, महेंद्र पाटील, पंकज पाटील बापु वाडीले उपस्थित होते.