सीसीईडब्ल्युमध्ये महिलांसाठी संशोधन अभ्यासक्रम

0

पुणे । अनसिस व कमिन्स या संस्थांच्या वतीने शैक्षणिक संशोधनाला चालना देण्यासाठी कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेनमध्ये (सीसीईडब्ल्यू) सेंटर ऑफ रिसर्च अ‍ॅन्ड इन्टेलेक्च्युअल आंत्रप्रेन्युअरशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.कमिन्स इंडिया एबीओ येथील कार्यकारी संचालक मार्क फिर्थ म्हणाले, सीसीईडब्ल्यूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संशोधनाची संस्कृती जोपासत महिला इंजिनिअर्सच्या विकासावर भर दिला जाणार आहे. यामुळे उच्च-कौशल्यपूर्ण महिला इंजिनिअर्सचा प्रतिभावान समूह व उद्योग-केंद्रीत संसाधनांची निर्मिती होईल. शिक्षकांच्या कौशल्यांमध्ये वाढ करत अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आवश्यक असणार्‍या तांत्रिक कौशल्यांचा विकास करून जागतिक विकासात योगदान देण्याचा उद्देश आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत कमिन्स नेहमीच अग्रस्थानी असल्याचेही फिर्थ यांनी सांगितले.

अनसिसच्या साउथ एशिया पॅसिफिक व मिडल इस्टचे कंट्री मॅनेजर रफिक सोमानी म्हणाले, उद्योगकेंद्रीत संसाधनांसह उच्च कौशल्ये असलेल्या महिला इंजिनिअर्सच्या गटाला सज्ज करण्यात अनसिसला अभिमान वाटतो.

दर्जेदार अभियंत्या निर्माण होतील
सीसीइडब्ल्यूच्या संचालिका डॉ. माधुरी खांबेते म्हणाल्या, अनसिस आणि कमिन्स यांच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या या अभ्यासक्रमात पदवीपूर्व व पदव्युत्तर पातळ्यांवरील संशोधनाला चालना देण्यात येईल. यातून दर्जेदार अभियंत्या निर्माण होतील व देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील.