सीसीटिव्हीच्या माध्यमातून ठेवणार नजर

0

तळोदा । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती बरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलींद वाघमारे यांनी तळोदा पालीका सभागृहात बैठकीचे आयोजन केले. बैठकीस नगराध्याक्षा रत्नाबाई चौधरी, प्रतोद भरत माळी, नगरसेवक संजय माळी,पंकज राणे, अजय परेदशी सतीवान पाडवी ,वसूबाई पाडवी, मुख्याघिकारी जर्नादन पवार, प्रकाश ठाकरे, रईसअली अब्बासअली, अनिल माळी उपस्थित होते.

डीजे व बँजोला बंदी
यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की शहरात विकास कामे सुरू आहे. शहारातील मुख्यरस्त्यांवर गल्ली बोळ्याच्या रस्त्यांवर पडलेली खडी,मुरूम उचलून रस्ता मेाकळा करावा, जेणे करून त्या मार्गवरून मिरवणूक जात असेल तर अडथळा निर्माण होवू वेळ प्रसंगी मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून रस्ता मोकळा करावा अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरिक्षक मिलींद वाघमारे म्हणाले की शहारातील संवेदनशील भागात सहा सीसीटी व्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सीसीटिव्ही लावून या भागातील पारीस्थितीवर नजर ठेवली जाईल. डिजे व बॅज्जोला बंदी असून शासनाने घालून दिलेल्या नियमावली प्रमाणे उत्सव साजरा करावा. तसेच प्रत्येक गणेश मंडळ पदाघिकार्‍यांनी आपल्या मंडळाचे स्वंयमसेवक नेमावेत. लोकप्रतिनिधींनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे आवाहन केले. यावेळी पालीकेचे अधिकारी विजय सोनवणे, राजेंद्र सौदांणे, राजेंद्र माळी, अश्विन परदेशी आदी कर्मचारी उपास्थित होते