पाचोरा प्रतिनिधी । सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी अट्टल घरफोड्याला अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोर्यात अलीकडे चार ते पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. पोलिसांनी विविध भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले. कॅमेर्यात कैद झालेल्या एकावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. यातील संशयित आरोपी हा शेंदुर्णी येथील असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाचोरा पोलिसांनी शेंदुर्णी येथील स्थानिक पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मदतीने आरोपीस त्याच्या जंगीपुरा (ता. जामनेर) येथील शेतातून संदीप अर्जुन गुजर, कुमावत गल्ली (शेंदुर्णी) यास अटक करुन पाचोरा पोलिस ठाण्यात आणले.