अडावद । अडावद पोलीस ठाण्यास जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी भेट देऊन सिसिटीव्ही कॅमेराची पाहणी केली. यावेळी चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, अडावदचे सपोनी जयपाल हिरे हे उपस्थित होते. यावेळी कराळे यांनी सपोनी जयपाल हिरे यांचे गावातील प्रत्येक कॅमेराचे लाईव्ह कव्हरेज पोलीस ठाण्यात बसून बघू शकतो अश्या पद्धतीचे केलेल्या कामाची प्रशंसा केली. यावेळी गावातील सरपंच व शांतता समिती सदस्य आणि गावातील नागरीक उपस्थित होते.