सी. एम.चषक रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

तालुक्यात दहा हजार रांगोळीचा उच्चांक ; आमदारांची घरोघरी भेट

चाळीसगाव- देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव ठरलेला सी.एम.चषक स्पर्धेला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रेकॉर्ड ब्रेक दहा हजार पेक्षा अधिक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत आमदार उन्मेष पाटील , स्पर्धा समन्वयक सचिन पवार हे घरोघरी जाऊन रांगोळी काढणार्‍या माता भगिनींना त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करीत आहेत. हिरापुर रोड वरील दीपिका व पल्लवी वसंत गवळी या विद्यार्थ्यानी काढलेल्या कमळाच्या फुलाला पाने सात ,देश सुधारण्यास भाजपचा हाथ ही अभिनव संकल्पना असलेल्या रांगोळी स्पर्धकाला त्यांनी सन्मानित केले यावेळी नगरसेवक चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, सारंग जाधव, योगेश गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यात भरघोस प्रतिसाद
तालुक्यात रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून घरोघरी रांगोळी काढल्याचे चित्र दिसून येत आहे ,भाजप सर्व आघाड्या, पदाधिकारी , युवा मोर्चा यांचेसह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करीत आहेत. घरोघरी रांगोळी काढल्याने चाळीसगाव तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार रांगोळी काढल्याचा उच्चांक गाठला आहे .