पेन्ह । प्रत्येक मुलीलाच आपण सुंदर व आकर्षक दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुणी मोठा खर्च करतात. विविध कॉस्मेटिक्सचा वापर करतात. पार्लरमध्ये जाऊन पैसे मोजतात. सुंदर दिसण्यासाठी असा अनेक खटाटोप मुली करतात. कंबोडियातील एका अभिनेत्रीसाठी तिचे सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरला आहे. कंबोडियन सरकारने ती सुंदर आहे असे सांगत तिच्यावर एक वर्षांसाठी चित्रपटात काम करण्यासाठी निर्बंध घातले आहे.
या अभिनेत्रीचे नाव डेनी कॉन असे आहे. तिच्या सौंदर्यामुळे कंबोडिया सरकारने पुढील एक वर्षभर तिला नवीन चित्रपटात काम करण्यास मनाई केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, सरकारचे मते 24 वर्षीय डेनी आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच रूपवान आहे. त्यामुळे तिच्यावर असे प्रतिबंध लादण्यात आले आहेत. कंबोडियन संस्कृती आणि कला मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डेनीची फेसबुकवर टाकलेली छायाचित्रे आचारसंहितेचे उल्लंघन करतात. फेसबुकवर जगभरातील तीन लाखांहून जास्त लोक तिचा फॉलो करतात. तूर्तास सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे डेनी आता आणखी एक वर्ष कॅमेर्याला सामोरी जाऊ शकणार नाही. यामुळे नाराज झालेली डेनी सांगते की, अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत मी असे काहीच करत नाही, ज्यामुळे माझ्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. कंबोडियातील अन्य नट्याही मादक आहेत. काहीजणीतर चित्रिकरणात माझ्यापेक्षाही भडक पोझ व चुंबनदृश्य देतात. मग माझ्यावरच बंदी का? अशा सवाल तिने उपस्थित केला आहे.