सुंदर पिचाई यांची गूगल अ‍ॅपची घोषणा

0

न्यूयॉर्क । सध्या आपण मोबाइलमध्ये असलेल्या कॅमेर्‍याचा उपयोग कशासाठी करतो? फोटो काढण्यासाठी? व्हिडिओ रेकोर्ड करण्यासाठी? सेल्फी वगैरे सर्व आलचं. पण आता यापुढे जे काही तुम्हाला कॅमेरातून मिळणार आहे ते भन्नाट असेल. अशी गोष्ट ज्यावर सध्या तुम्ही विश्‍वास ठेवणार नाही. पण हे खरयं कारण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीच एक घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मोबाइलच्या कॅमेर्‍याची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे.

एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसेल आणि शोधायला वेळही नाहीए. अशावेळी काय करायचं? नाही कळतंय ना? तर अशावेळी त्या संबंधित गोष्टीचा फोटो काढायचा. बस्स.. झाले. एवढचं. हो. कारण गुगल असे अ‍ॅप आणत आहे ज्यामध्ये फोटो काढलेल्या वस्तूची माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. समजा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचा फोटो स्कॅन केला तर तुम्हाला पुढच्या काही वेळात त्याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.

नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या नव्या गुगल अ‍ॅपची घोषणा केली आहे. ‘गूगल लेन्स’ असं या अ‍ॅपचं नाव असून हे अ‍ॅप आगळेवेगळे असणार आहे. या अ‍ॅपमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेडलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय गुगल अ‍ॅसिस्टंटच्या मदतीने गूगल लेन्स यूझर्सला भाषांतर करण्यासही मदत मिळेल.

गूगल लेन्स वापरा
एखाद्या फोटोबाबत तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगल लेन्स वापरा. गूगल लेन्स सुरू करताच तुम्ही काढलेला फोटो स्कॅन होईल आणि त्या फोटोसंबंधी सर्व माहिती एका क्षणात तुमच्या मोबाइल स्क्रिनवर दिसेल. त्यामुळे तुमच्या मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही.

असाही होईल फायदा
गुगल लेन्स अ‍ॅप हे गुगल अ‍ॅसिस्टेंटसोबतही वापरता येणार आहे. अ‍ॅसिस्टेंट अ‍ॅपमध्ये नव्यानं दिलेल्या ऑप्शन सिलेक्ट करून यूजर बोलताना देखील लेन्स अ‍ॅक्टिव्हेट करू शकतो. त्यामुळे बातचीत सुरू असताना देखील एखाद्या फोटोबाबत जाणून घ्यायचं असेल तर यूजर्स संबंधित फोटो स्कॅन करून त्याबाबत माहिती मिळवू शकतो. तर तुम्हाला फोटो कशासंबंधी आहे? याचीही माहिती देईल. असा कंपनीचा दावा आहे.