‘सुई धाग्या’साठी वरून धवनने घेतली खास ट्रेनिंग

0

मुंबई –वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा आगामी येणारा चित्रपट ‘सुई धागा’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटासाठी वरून धवनने खास ट्रेनिंग घेतली आहे. ३ महिन्यांचे टेलरींचे प्रशिक्षण वरुणने घेतले आहे.

एखा मुलाखतीत वरून म्हटला ”माझ्यासाठी हा टास्क खूप कठिण होता. लोकांना मी खरेच मास्टरजी आहे हे पटवून देण्याची कला माझ्याकडे आहे. दर्शन ( ड्रेस डिझायनर ) आणि नूर भाभी ( सेटवरील टेलर ) या दोघांनी मला मदत केली. त्यांनी मला ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले.” सुरुवातीला मला जमत नव्हते त्यामुळे मी निराश झालो होतो. अनेकवेळा बोटांना सुईने टोचले गेले. मी नव्या तऱ्हेने याचे कौशल्य शिकलो याबद्दल मला बरे वाटते. काहीवेळा २ तास तर काहीवेळा ४ तासांचे हे प्रशिक्षण असायचे. यामुळे कॅमेऱ्यासमोर आणि मागे मी आत्मविश्वासाने टेलरिंग करु शकलो. असेही वरुणने सांगितले.