सुकळीत माकडाच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील सुकळी येथे माकडाच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सचिन प्रकाश इंगळे (15) हा विद्यार्थी शाळेला जात होता. त्याच्यावर अचानक माकडाने हल्ला केला. त्यामुळे त्याच्या हातावर जखम झाली. सुकळी येथील पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर उपचार करण्यात आले.