सुकळीत शिवारात वाघिणीचा मृत्यू

0

वयोमानाने मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

मुक्ताईनगर– तालुक्यातील डोलारखेडा शिवारातील सुकळी शिवारात 16 वर्षीय वयोमान असलेल्या वाघिणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली. हा मृत्यू शिकारीमुळे झाला की अन्य कारणामुळे याबाबत अधिकृत माहिती कळू शकलेली नाही मात्र वयोवृद्ध वाघीण असल्यानेच हा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. सुकळी शिवारातील जयराम पाटील यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाघिणीचा मृतदेह आढळला.