रावेर : सुकीनदी पत्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाला तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या पथकाने जप्त केली आहे. यामुळे वाळू वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिनवालजवळील सुकीनदी पत्रातून वाळू उपसा सुरु आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या पथकाने कारवाई केली. चिनवालचे सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी खिरोदा संदिप जैस्वाल, तलाठी उमेश बाभुलकर, सवखेडा बु तलाठी अजय महाजन यांनी ही कारवाई केली. वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.